परप्रांतिय तरुणीकडून तरुणाला गंडा

पिंपरी – एका परप्रांतिय तरुणीने ऑनलाईन पद्धतीने क्रेडीट कार्डद्वारे तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात तरुणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत अशोक बाचल (वय-31, रा-वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. राधा गुप्ता (रा. बीसादा, जि. गौतम बुद्धनगर, उत्तर प्रदेश) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत तरुणीने अनिकेत यांच्याशी वारंवार फोनवरुन संपर्क साधत त्यांचा विश्‍वास संपादन केला. अनिकेतच्या क्रेडीट कार्डचा पासवर्ड व ओटीपी क्रमांक घेतला व त्याद्वारे परस्पर एक लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर अनिकेत याने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने कोणताही प्रतिसाद न दिल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)