परदेशस्थ भारतीयांनी गेल्या वर्षी भारतात पाठवले 69 अब्ज रुपये – विश्‍व बॅंक

नवी दिल्ली – परदेशस्थ भारतीयांनी गेल्या वर्षी भारतात 69 अब्ज रुपये पाठवल्याची माहिती विश्‍व बॅंकेने दिली आहे विविध देशांमध्ये नोकरी-कामधंद्यानिमित्त राहणाऱ्या भारतीयांऩी ही रक्कम पाठवल्याची माहिती विश्‍व बॅंकेने दिली आहे. परदेशातून देशात पाठवण्यात येणाऱ्या रकमेबाबात भारत अग्रस्थानी आहे. याबाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. गेल्यावर्षी परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांनी मायदेशात 64 अब्ज रुपये पाठवल्याची नोंद आहे.

परदेशस्थ भारतीयांनी सन 2017 साली पाठवलेली रक्कम त्याच्या अगोदरच्या (2016) वर्षापेक्षा 9.9 टक्के अधिक असल्याचे विश्‍व बॅंकेच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र सन 2014 मध्ये पाठवण्यात आलेल्या 70.4 अब्ज रुपयांपेक्षा ही रक्कम कमीच आहे,कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि युरो व रुबल्सला आलेली मजबूती यामुळे मायदेशात पाठवण्यात आलेल्या रकमेत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)