पब्जीवर बंदी घाला; हायकोर्टात याचिका 

मुंबई – लहान मुलेच नव्हे तर मोठ्यांनाही तासनतास मोबाईलवर खिळवून ठेवणाऱ्या पब्जी या ऑनलाईन गेमवर तातडीने बंदी घाला, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अहमद निझाम या 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांने आपल्या आईमार्फत दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

पब्जी या ऑनलाईन मोबाईल गेमने भल्याभल्यांना वेड लावले आहे. पब्जी या मोबाईल गेममुळे हिंसाचार वाढत असून सायबर गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या गेमवर बंदी घालण्याचे आदेश द्यावे. तसेच समाजात हिंसाचार पसरवणाऱ्या गेमवर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे केंद्र सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे,अशी माहिती याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. तन्वीर निझाम यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)