पद्मश्रीप्राप्त नृत्यांगनेवर सीबीआयचा गुन्हा

नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भरत नाट्यम्‌ नृत्यांगना आणि संगित नाटक कला आकादमीच्या माजी अध्यक्षा लीला सॅमसन यांच्यावर कलाक्षेत्र फाउंडेशनच्या कूठांबलम प्रकल्पात अफलदायी असे सात कोटी वीस लाख रुपये खर्च केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण पथकाने (सीबीआय) गुन्हा नोंद केला. सॅमसन यांच्यासह फाउंडेशनच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सीबीआयकडे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अन्वेषण अधिकाऱ्यांनी याबाबत आर्थिक नियमांचा भंग केल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकल्पावर मुळच्या 7.02 कोटी रूपयांपेक्षा 62.20 लाख रूपये अतिरिक्त खर्च केल्याचा आरोप होत आहे. या सभागृहाच्या नुतनीकरणाची आवश्‍यकता भासल्याने त्याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्या कामात आर्थिक खर्चाचे नियम पाळले नसल्याचा आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.