पदव्युतर अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील पदव्युत्तर विभागाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास येत आहे. काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आहेत. काही प्रवेश प्रत्यक्ष गुणवत्तेद्वारे होतील. कोणत्या विभागाच्या प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे, त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एम.एस्सी, एम. ए, एम. कॉम, एम.टेक, डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्सेस, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसाठी प्रवेश परीक्षा राहणार आहेत. अर्ज ऑनलाईन करणे आवश्‍यक आहे. अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी 30 टक्‍के कोटा आहे. प्रवेश परीक्षेसाठी खुल्या संवगांतील विद्यार्थ्यांना 500 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 350 रुपये शुल्क आहे. शुल्क ऑनलाईनद्वारे भरता येऊ शकेल. शिक्षणशास्त्र, मराठी, हिंदी, इतिहास, बीएस्सी बीएड, संस्कृत व प्राकृत विभाग, मानसशास्त्र विषयाचा पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिझाइन इनोव्हेशन सेंटर येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा नसतील.

मात्र येथील प्रवेश गुणवत्तेनुसार होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, सध्या विद्यापीठातील रसायनशास्त्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, जैवतंत्रज्ञान, भूशास्त्र, मॅनेजमेंट सायन्स, तंत्रज्ञान आणि भौतिकशास्त्र विषयाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाची अंतिम तारीखही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)