पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमातून ‘स्वच्छते’चे धडे

स्वच्छतेचे महत्त्व होतेय अधोरेखित
स्वच्छतेची माहिती व त्याची संकल्पना, सॅनिटेशन शिक्षण, सुका आणि ओला कचरा व्यवस्थापन, शुद्ध पाण्याचे नियमन व देखभाल, स्वच्छता आणि पाणी संबंधित आजार, जलविज्ञान आणि पर्यावरण संरक्षण, प्रोजेक्‍ट व थेसिस इत्यादी घटकांचा या ऑनलाईन अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

व्यंकटेश भोळा

भारतीय विश्‍वविद्यालयाचे पुणे विद्यापीठाला पत्र : प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत

पुणे – भारतीय विश्‍वविद्यालय परिसंघाने “स्वच्छता’ या विषयावर ऑनलाईन आणि दूरशिक्षण पद्धतीने प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पातळीवर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवेश घेण्यासाठी दि. 30 जूनपर्यंत मुदत आहे. त्याबाबतचे पत्र परिसंघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले असून, या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारने “स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशात राबविण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्‍त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्याचे सुचित केले आहे. त्याला पुरक म्हणून आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्‍लिनलीनेस एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (एनआयसीईआर) यांच्यामार्फत स्वच्छतेवर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

“एनआयसीईआर’ने देशातील 41 विद्यापीठांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याबाबतचे पत्र त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाठविले आहे. गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून, त्याला अधिक व्यापकता देण्यासाठी आता ऑनलाईन अभ्यासक्रमाची मोहीम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी दि. 30 जूनपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे. प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमामध्ये कोणत्या घटकांचा समावेश राहणार आहे, त्याचा तपशीलही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

“स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत हे अभ्यासक्रम तीन महिने, सहा महिने आणि एक वर्ष कालावधीचा राहणार आहे. प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पदविका असे अभ्यासक्रमाचे स्वरुप आहे. अभ्यासक्रम ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना पूर्ण करता करण्याची संधी आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी 5 हजार 125, पदविकासाठी 9 हजार 125 आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी 12 हजार 525 इतकी शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

स्वच्छतेवरून प्रोजेक्‍ट, रिपोर्ट व थेसिस सादर करणे आवश्‍यक असून, अभ्यासक्रमात त्याला महत्त्व राहणार आहे. ही परीक्षा जवळचे महाविद्यालय अथवा विद्यापीठात घेण्यात येतील. परीक्षा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. विशेष म्हणजे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियलही दिले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)