पत्रसंवाद

शैलेंद्र भुतडा

वाहतुकीचे नवीन नियम म्हणजे चुकून धक्‍का मारणाऱ्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यासारखे आहे. देशातील रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था कोणत्या अवस्थेत आहे हे सर्वांना माहीत आहे. भ्रष्टाचार, अन्न व औषधांमध्ये भेसळ करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून असंघटित वाहनचालकांवर कारवाईकरून मोठ्या प्रमाणात पैसा वसूल कण्यातच सरकारला जास्त रस दिसत आहे.

रस्त्यांमध्ये खड्डे व खड्ड्यांमध्ये खड्डे करणारी बेजबाबदार यंत्रणा जी दररोज हजारो लोकांच्या जीवनाशी खेळत आहे ती मोकाट आहे. खुलेआम भ्रष्टाचार करणारे निर्दोष सुटत आहे; पण वाहनचालक सुटता कामा नये अशी सरकारने (अ)व्यवस्था केली आहे. जनतेने यासाठी सरकारला निवडून दिले आहे का? जेव्हा विपक्ष भरकटतो व कमकुवत होतो तेव्हा सत्ताधारी पक्ष हेकेखोर व हुकूमशहा बनतो. अशावेळी जनतेनेच विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे. वाहतुकीचे नवीन नियम म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×