पत्नी, मुलीसह सहा जणांवर चाकूने वार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे – मूळगावी परत येत नसल्याच्या रागातून पत्नी आणि पोटच्या मुलीसह सहा जणांवर चाकूने वार करणाऱ्याचा जामीन लष्कर न्यायालयाने फेटाळला.
मिलिंद शहाजी कसबे (30, रा. खंडोबाचा माळ, फुरसुंगी, मूळ रा. दुधगाव ता. उस्मानाबाद) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचे सासरे दिलीप देवराम कांबळे (42, रा. प्रगतीनगर, काळेपडळ, हडपसर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याने पत्नी नंदीनी (24), मुलगी गौरी (4), सासरे दिलीप देवराम कांबळे (42) आणि त्यांचे बंधू मनोहर देवराम कांबळे (55), सागर मनोहर कांबळे (21) आणि ताईबाई मनोहर कांबळे (55 सर्व रा. प्रगतीनगर, काळेपडळ, हडपसर) यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले आहे. कसबे हा पत्नीला मूळ गावी उस्मानाबाद येथे जाण्याचा आग्रह करत होता. परंतु पत्नी नंदीनी याला तयार नव्हती. याचा रागातून त्याने पत्नीसह चार वर्षाच्या मुलीवर चाकूने वार करून खूनाचा प्रयत्न केला. तसेच दोघींना वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडीलांसह त्यांचा भाऊ आणि मुलांवरही चाकूने वार केले. त्यानंतर स्वतःवरही वार करून घेतले. या प्रकरणात याने जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. त्याला जामीनावर सोडल्यास तो पुन्हा पत्नीसह इतरांच्या जिवाला धोका पोहचविण्याची शक्‍यता आहे. तो त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करेल, तो फरार होण्याचीही शक्‍यता असल्याने त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. बेंडभर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने कसबे याचा जामीन फेटाळला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)