पत्नीवर गोळीबार करून सहसचिव पवार यांची आत्महत्या

सोलापूर: मंगळवेढा तालुक्‍यातील मरवडे गावचे सुपुत्र व नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्या मंत्रालयात कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार पवार यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार रात्री 12. 30 च्या सुमारास मरवडे गावात घडला.

आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी पत्नीवर गोळीबार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी आहे. पवार हे कौशल्य विभागात सचिव पदावर कार्यरत असून काल ते मुंबईहून गावाकडे आले होते. रात्री पती व पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे घरगुती वादातून टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

विजय पवार हे सरदार सरोवर गाऱ्हाणे निराकरण प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार येथे कार्यरत होते. अडीच वर्षे त्यांनी येथे काम केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस नाईक हरिदास सलगर हे घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची नोंद करण्यात आली असून सोलापूर पोलीस पुढील तपास करित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)