पगार पेट्रोल सारखा असला पाहिजे…

रोहन मुजूमदार 

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून मोदी सरकार सोशल मीडियावर ट्रोल

पुणे – पगार तर पेट्रोल सारखा असला पाहिजे, सकाळी उठल्यावर समजल पाहिजे की आज पुन्हा वाढला’, अशा अनेक संदेशांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून विविध संदेशांद्वारे मोदी सरकारला ट्रोल केले जात आहे. तर सरकावर प्रेम करणाऱ्यांकडून तोडीस तोड उत्तर मिळत आहे. मात्र, यापासून नेटकऱ्यांची चांगलीच चंगळ होत असून ते खळखळून हसत असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहणार यात काही शंकाच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सकारात्मक, नकारात्मक दोन्ही प्रकारच्या गोष्टींवर नागरिक तत्काळ भाष्य करताना दिसतात. असेच काहीसे चित्र गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढी संदर्भात पाहयला मिळत आहे. गेल्या काही दिवसांध्ये सातत्याने इंधन दरवाढ होत असून सध्या 86 रुपये एवढा उच्चांकी दर पेट्रोलने गाठला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला सोशल मीडियावर “ट्रोल’ करण्यात येत असून, असंख्य विनोद आणि छायाचित्र सध्या फिरत आहेत.

पूर्वीच्या सरकारच्या काळात पेट्रोलची दरवाढ झाल्यानंतर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेचे व्हीडीओसुद्धा शेअर करण्यात येत आहेत. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या पूर्वीच्या एका जाहिरातीमध्ये पेट्रोल दरवाढीवरून टीका करणाऱ्या “ताई’ आता कोठे गेल्या, असेही विचारले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर काढलेले व्यंगचित्र या दरवाढीच्या निमित्ताने पुन्हा व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील काही मज्जेदार संदेश..
“गाडी’ आज उभी केली दारी,
“सायकल’ घेऊन
निघालो कामावरी

पूर्ण होवोत तुमच्या
मनातील इच्छा
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पेट्रोल’
दरवाढीच्या हार्दिक शुभेच्छा…

सरकारने एकतर पेट्रोलचे दर तरी कमी करावेत, नाही तर रामदेव बाबाला सांगून गोमूत्रावर गाड्या चालवता येतील का? हे तरी विचारून बघावे.

गाडीत पेट्रोल भरण्यासाठी कोणी लोन देतंय का लोन ?

पेट्रोल- डिझेलचे भाव वाढलेले नाहीत. तुमच्या गाडीचा ऍव्हरेज कमी झाला असेल?

आता एकदाचे पेट्रोल 86 रुपये करा आणि पेट्रोल पंपांवर गायछाप-चुनापुडी ठेवा …. म्हणजे 100 ची नोट दिल्यावर परत पैसे घ्यायचा ताण नको.

बहुत हुई जनता पर पेट्रोल-डिझेल की मार, अबकी बार मोदी सरकार

पगार तर पेट्रोल सारखा असला पाहिजे, सकाळी उठल्यावर समजल पाहिजे की आज पुन्हा वाढला’

एकतर पेट्रोल चे दर कमी करा ..
नाहीतर ट्रिपल सीट ला परवानगी द्या …
बगा काय जमेल ते
तिघात मिळून परवडतय

आता तर भाववाढची इतकी सवय झाली, की दर पंधरा दिवसांमध्ये जर डिझेल, पेट्रोलचे दर वाढले नाही तर असे वाटते की विकास थांबला की काय?’, बाळाचे नाव पेट्रोल ठेवा, त्याची वाढ झपाट्याने होईल’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)