पक्ष, संघटना बळकटीसाठी महिलांची डिजिटल नोंद करा

मंचर- सर्वसामान्य व्यक्ती डोळ्यापुढे ठेवून त्याला आवश्‍यक ते मार्गदर्शन केल्यास त्यांची प्रगती होईल. त्यासाठी महिलांनी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांची डिजीटल नोंदणी करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा सावंत यांनी केले.
आंबेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीला पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी महिलांना महिला सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंतभाऊ शेवाळे, माजी सरपंच अश्‍विनी शेटे, पुणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रिती शिंगोटे, खेड तालुका महिला अध्यक्षा जया मोरे, आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा अर्चना चिखले, युवक अध्यक्ष सचिन बाणखेले, माजी सरपंच कैलास गांजाळे तसेच आंबेगाव तालुका महिला कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रास्ताविक आणि आभार आंबेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे समन्वयक विक्रांत भोर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)