पंतप्रधान मोदी चीनमध्ये पोहोचले, जिनपिंग यांच्याबरोबर सहा बैठका

वुहान (चीन) : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी गुरुवारी (दि. २७) रात्री उशिराने चीनमधील वुहान शहरात पोहोचले आहेत. या दौऱ्यात २४ तासांमध्ये सहा वेळा पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यामध्ये बैठका होणार आहेत. मात्र, या बैठका अनौपचारिक असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यात येणार नाही. तरीही, डोकालाम मुद्द्यावरून भारत-चीनचे ताणले गेलेले संबंध आणि पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या तसेच भारताच्या ‘एनएसजी’ सदस्यत्वाला चीनने केलेला विरोध, या पार्श्वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)