पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यावर शिवसेनेची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच चीनचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात कोणत्याही वादग्रस्त विषयांवर बोलणे टाळल्याचे सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. यावर शिवसेनेने सामना संपादकीयमधून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे.

मोदी यांना चीनच्या सीमेवर शांतता हवी आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निदान निवडणूक काळात चीनने कटकटी वाढवू नयेत. एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या, मग काय ते बघू अशी एकंदरीत मोदी यांची भूमिका दिसते. पंडित नेहरू यांनी चीनशी मैत्री केली ती अंगलट आली. नेहरू यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मात्र नेहरू यांच्या ‘पंचशील’च्याच मार्गाने सध्याचे पंतप्रधान चीनचा प्रश्न सोडवू पाहत आहेत. नेहरू हे ‘पंचशील’चे उद्गाता होते. मोदी हे पंचसूत्राचे पाठीराखे बनले, पण विचार नेहरूंचाच आहे. ‘‘युद्ध नको तर बुद्धच हवा’’ हे नेहरूंप्रमाणे विद्यमान पंतप्रधान मोदी यांनाही पटले आहे असे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यावर काय म्हणणे आहे? असा प्रश्नही शिवसेनेने भाजप व संघाला विचारला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)