पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्याचे यश ; दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार सुरु

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या डोकलाम प्रश्नावरून वाद सुरु होता. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यानंतर भारतासाठी एक चांगली बातमी पुढे आली आहे. दोन्ही देशातील नाथुला सीमेवरून द्विपक्षीय व्यापारास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत आणि चीन दरम्यान असणाऱ्या सीमेवर दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी एकमेकांना सुधारलेल्या संबंधाविषयी शुभेच्छा दिल्या. तसेच अधिकाऱ्यांमध्ये भेटवस्तूंची आदानप्रदान देखील झाली. सिक्कीम वाणिज्य आणि उद्योग विभागाच्या एका अधिकाऱ्याने, २०१६-१७ दरम्यान, दोन्ही देशातील व्यापारामुले देशाला तब्बल ३.५४ कोटीचा फायदा झाला असल्याचे म्हटले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या वर्षात कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही तर दोन्ही देशाला आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मागील ७३ दिवसापासून दोन्ही देश एकमेकांसोबतच्या संबंधात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुले यश आल्याचे दिसत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)