पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये पारंपरिक पद्धतीचे स्वागत

वुहान (चीन) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनच्या वुहान शहरात पोहचले तेथे त्यांचे पारंपरिक चिनी पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. शी जिनपिंग यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चेनंतर दोन्ही नेते चीनमधील सर्वोत्तम संग्रहालयाला भेट देणार आहेत. शनिवारी दोन्ही नेते चीनचे माजी अध्यक्ष आणि क्रांतिकारी नेते माओ त्से तुंग यांचे आवडते ठिकाण असलेल्या ईस्ट लेक च्या किनारी रात्रीचे भोजन घेणार आहेत.

सरोवराच्या किनारी फेरफटका मारणार आहेत आणि सरोवरात बोटीची सफरही करणार आहेत. ईस्ट लेक गेस्ट हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदींसाठी शी जिनपिंग हे दोन दिवस राजधानी बीजिंगपासून दूर राहणार आहे. एखाद्या राष्ट्रप्रमुखासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवस राजधानीबाहेर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचा हा चौथा चीन दौरा आहे. दोन्ही देशांतील काही अतिविवादास्पद मुद्यांवर सहमतीचा तोडगा काढणे हा या अनौपचारिक भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन दिवसांत नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या 5 ते 6 भेटी म्हणजे दिल से दिल की बात असा प्रकार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन नेत्यांमधील अनौपचारिक चर्चेनंतर दोन्ही देशांच्या 6-6 अधिकाऱ्यांसह पुन्हा वाटाघाटी होणार आहेत.
सन 2014 मध्ये गुजरातमधील साबरमती आश्रमात झालेल्या भेटीनंतर मोदी आणि जिनपिंग यांची डझनभर वेळा भेट झालेली आहे. या शिखर परिषदेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या परिषदेनंतर ना कोणत्या करारावर सह्या होणार आहेत, ना कोणते संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोणत्याही घोषणा न करता प्रत्यक्ष कारवाईबाबत विचाविनिमय होणार आहे.

मोदी-जिनपिंग भेटींचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे दोन देशांतील लष्कराचा संघर्ष कमी होणार आहे. चिनी आणि भारतीय लष्करातील संबंधात स्थिरता यावी आणि सीमाभागांत शांतता नांदावी अशी दोन्ही बाजूंची इच्छा असल्याचे चिनी लष्कराचे प्रवक्ते कर्नल वु किआन यांनी बोलून दाखवले आहे.

जगातील 40 टक्‍के लोकसंख्या असलेले भारत आणि चीन हे दोन देश मिळून जागतिक शांततेसाठी मोठे काम करू शकतात असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी शी जिनपिंग यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)