पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मेला जाणार नेपाळ दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मेला नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ११ मेला काठमांडू आणि जनकपूरला पंतप्रधान मोदी जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे. पण २०१५ मध्ये नेपाळी संविधानाच्या घोषणेनंतर हा पंतप्रधान मोदींचा पहिला दौरा आहे.

काही दिवसांपूर्वीच नेपाळचे पंतप्रधान ओली आपल्या पहिल्या दौऱ्यात भारतात आले होते. ३ दिवसाच्या या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात संरक्षण आणि व्यापार अशा मुद्द्यावर सहयोगाबाबत चर्चा झाली. भारत आणि काठमांडूमध्ये कनेक्टिविटी वाढवण्यासाठी देखील यावेळी चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)