पंतप्रधान इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पाच दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान सर्वप्रथम इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्या निमंत्रणानुसार जकार्ता येथे जाणार आहेत. 30 मे रोजी इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको व्हिडोडो यांच्याबरोबर मोदी यांची चर्चा होणार आहे. भारत-इंडोनेशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचांसोबतच्या संयुक्त संवादासाठी ते उपस्थित राहणार आहेत. तसेच इंडोनेशियामध्ये भारतीय समुदायाला ते संबोधित करणार आहेत.

31 तारखेला सिंगापूरला जाताना नवीन मलेशिया नेतृत्वाचे अभिनंदन करण्यासाठी अगदी थोड्या वेळासाठी मपंतप्रधान मलेशियाला थांबणार आहेत. तेथे नवनियुक्‍त पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना ते भेटणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंगापूर दौऱ्यादरम्यान मोदी फाइनटेक, कौशल्य विकास, शहरी नियोजन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रात भारत-सिंगापूर भागीदारी अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. सिंगापूरमध्ये भारत-सिंगापूर उद्योग आणि नवोन्मेष प्रदर्शनाला भेट देणार आहे. सिंगापूरच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्यवसाय आणि गुंतवणूक संधींबाबत चर्चा आणि व्यावसायिक आणि समुदायाला संबोधित करणार आहेत.

1 जून रोजी सिंगापूरचे अध्यक्ष हलिमा याकोब आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा होणार असून नानयांग तांत्रिकी विद्यापीठातील तरुण विद्यार्थ्यांशी मोदी संवाद साधाणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी शांगरी-ला डायलॉग येथे पंतप्रधान भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर भाषण देतील.

गांधीजींच्या अस्थि 27 मार्च 1948 रोजी समुद्रात जेथे विसर्जित केल्या होत्या त्या क्‍लिफफोर्ड पीर इथे एका फलकाचे उद्‌घाटन मोदींच्या हस्ते 2 जून रोजी होणार आहे. या दौऱ्यात शेवटी सिंगापूरमधील चांगी नौदल तळाला मोदी भेट देणार आहेत. तेथे ते भारतीय नौदल जहाज आयएनएस सातपुरला भेट देऊन भारतीय नौदल आणि रॉयल सिंगापूर नौदलाच्या अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)