पंतप्रधानाच्या डॉक्‍टरांबद्दलच्या वक्‍तव्याबद्दल आयएमएकडून निषेध

पुणे – साधारण अठवडाभरापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लडमधील एका कार्यक्रमात भारतातील डॉक्‍टर्स हे औषधे लिहून देण्याचेही पैसे घेतात तसेच फार्मा कंपन्यांच्या परदेशातील कॉन्फरन्सला हजेरी लावतात. जेनेरिक औषधे लिहून देणे टाळतात अशा प्रकारचे आरोप केले होते. मोदींच्या या विधानाचा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध व्यक्‍त करण्यात आला. यावेळी कॅन्डल मार्च काढण्यात आला तसेच काळ्या फिती लावून काम करण्यात आले.

एकाच जेनेरिक औषधांच्या किमती वेगवेगळ्या कश्‍या?
पंतप्रधान मोदी हे डॉक्‍टरांच्या नावाने ओडतात परंतु त्यांनी याचे उत्तर द्यावे की, एकाच आजारासाठी निर्माण केलेल्या जेनेरिक औषधांच्या किमतीत कमालीची तफावत आढळून येते. एकाच औषधासाठी पाच ते सहा कंपन्या काम करतात. आजमितीला अशी अनेक औषधे आहेत ज्यांची एक गोळी एक कंपनी 23 पैशांना विकते तर तीच गोळी दुसरी कंपनी 9 रुपयांना विकते. जेनेरिक औषधांची किंमत ठरविण्याचे संपूर्ण अधिकार केंद्राचे आहेत, मग सरकार एक कंपनी एक औषध हे धोरण का लागू करत नाही? तसेच एकाच जेनेरिक औषधांचे तीन वेगवेगळ्या प्रकारात पॅकिंग कसे काय होते व त्याच्या वेगवेगळ्या किंमती कश्‍या काय असतात याचेही सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी आएमएमधील डॉक्‍टरांकडून करण्यात आली.

साधारण अठवडाभरापुर्वी इंग्लडच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी एका जाहीर कार्यक्रमात डॉक्‍टरांवर जोरदार टीका केली होती. यावर देशभरातील डॉक्‍टरांकडून मोदींच्या या वक्‍तव्यावर नापसंती दर्शविली गेली. याबाबत आज आएमएने पत्रकार परिषद घेऊन याबाबत जाहीर नापसंती दर्शविली.

पंतप्रधान मोदींचे ही डॉक्‍टरांविरोधातील वाक्‍ये कोणत्याही आकडेवारीचा आधार न घेता सरसकट केलेली होती. मोदींनी अशा प्रकारे परदेशात देशातील डॉक्‍टरांची बदनामी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी भारतातील डॉक्‍टरांचा अपमान केला आहे.
डॉ.पद्मा अय्यर, अध्यक्ष
आएमए, पुणे

यावेळी आएमएचे राजकुमार शहा म्हणाले, मोदींनी कुठेही काही निवडक डॉक्‍टर असा उल्लेख न करता सरसकट सर्व डॉक्‍टर असे करतात असे म्हटले आहे. याविरोधात आज आम्ही सर्वांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच आयएमएच्या वतीने पंतप्रधानांच्या या वक्‍तव्यांचा निषेधही आम्ही कॅन्डल मार्च काढून निषेध करतो आहोत. आयएमएने जेनेरीक औषधांचा नेहमीच आग्रह धरला आहे. एक औषध एक कंपनी यासाठीही आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. पंतप्रधानांची ही सवंग लोकप्रियतेसाठी शेरेबाजी प्रामाणिक डॉक्‍टरांसाठी मानहानीकारक आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)