पंतप्रधानाकडून महापालिकेचा गौरव

समान पाणी पुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या "म्युनिसीपल बॉन्ड' संकल्पनेसाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात शुक्रवारी गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त शितल उगले आणि महापालिकेच्या मुख्यलेखापाल उल्का कळसकर यांनी या पुरस्कार स्विकारला.

कर्जरोखे उभारणीसाठी विशेष पुरस्कार

पुणे:  महापालिकेला समान पाणी पुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या “म्युनिसीपल बॉन्ड’ संकल्पनेसाठी विशेष पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त शितल उगले आणि महापालिकेच्या मुख्यलेखापाल उल्का कळसकर यांनी या पुरस्कार स्विकारला.
स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

    महापालिकेकडून समान पाणी योजनेसाठी सुमारे 200 कोटींचे महापालिका कर्जरोखे उभारले आहेत. अशा प्रकारे शहर विकासासाठी कर्जरोखे उभारणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेत स्वयं शास्वत महापालिका म्हणून केंद्राकडून पुरस्कार स्वरूपात महापालिकेस या कर्जरोख्यावर 26 कोटींची सबसिडी देण्यात आलेली आहे. ही पुणे शहर तसेच पुणेकरांची गौरवाची बाब आहे. – मुक्ता टिळक ( महापौर)

लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात , केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्येमंत्री हरदीप सिंग पुरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप माजी आयुक्त आणि स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार उपस्थित होते. या शिवाय, महापालिकेकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट गव्हर्नन्स अंतर्गत सुरू केलेल्या पीएमसी केअर या या अभिवन तक्रार निवारण प्रणालीचीही केंद्राकडून विशेष दखल घेण्यात आली असून त्यासाठीही पालिकेस विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी कुलकर्णी, आयटी विभागाचे प्रमुख राहूल जगताप, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने या परिषदेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)