पंतप्रधानांच्या भाषणात लोकांना ‘खरेपणा’ शोधावा लागतो- राहुल गांधी

नवी दिल्ली: एरवी राजकीय नेते ज्यावेळी भाषणे करतात त्यावेळी विरोधक त्यामधील खोटी आश्वासने शोधण्याच्या कामाला लागतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर लोकांना त्यामध्ये ‘खरेपणा’ शोधाव लागतो, अशा जळजळीत  टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणबाजीवर सडकून टीका केली.

पंतप्रधान मोदी एकापाठोपाठ भाषणे करतात, जिथे जातील तिथे बोलतात. मात्र, यामध्ये भ्रष्टाचार, नोटाबंदीचे अपयश, शेतकऱ्यांच्या समस्या या एकाचाही उल्लेख नसतो. त्यांच्या परदेशांमधील भाषणांमध्ये ते मी देशाचा चौकीदार असून भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करतात. परंतु, भाजपा नेत्यांचे गैरव्यवहार आणि नीरव मोदी या मुद्द्यांवर मात्र ते सोयीस्कररित्या मौन बाळगतात, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी न्यायपालिकेतील असंतोष, राफेल विमान खरेदी, बेरोजगारी आणि देशभरातील बलात्काराच्या घटना या मुद्द्यांवरही भाष्य केले.

देशात सध्या मुली सुरक्षित नाहीत. भाजपाकडून आरोपींना संरक्षण दिले जाते, असा आरोप त्यांनी केला. एकीकडे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे बोलले जाते. मात्र, त्याचवेळी मोदी आपल्या उद्योगपती मित्रांना पैसे पुरवतात. काँग्रेस सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीचे कंत्राट हिंदुस्थान एनरॉटिक्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी हे एक विमान भारताला 700 कोटींना मिळणार होते. मात्र, मोदींनी सत्तेत आल्यानंतर हे सर्व व्यवहार रद्द केले. त्यांनी हिंदुस्थान एनरॉटिक्सकडून विमान निर्मितीचे कंत्राटही काढून घेतले. त्यामुळे राफेल विमानांची किंमत 1500 कोटींवर गेली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच देशाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयातील लोकांना प्रथमच न्यायासाठी जनतेसमोर यावे लागले, याकडेही राहुल यांनी लोकांचे लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)