पंजाबी सिंगर हार्डी संधू पुन्हा होतोय ट्रेंड यावेळी ‘क्या बात है’!

प्रसिद्ध पंजाबी सिंगर हार्डी संधू याचे नवीन गाणे ‘क्या बात है’ प्रदर्शची झाले असून या गाण्याने युट्युबवर धमालूडवून दिली आहे. हार्डी संधू यांचे ही गाणे यु ट्यूबवर ट्रेंड करत आहे. पंजाबी सिंगर हार्डी संधू यांच्या या गाण्याला २३ लाखांपेक्षा जास्त वेळा पहिले गेले आहे.

या गाण्याची दुसरी खासियत म्हणजे या मध्ये प्रसिद्ध ब्राझेलीयन मॉडेल कैरोलिना आहे.  या गाण्यामध्ये कैरोलिनाने जबरदस्त डान्स स्कील्स आणि अदाकारीचा उत्तम नमुना सादर केला आहे. हे गाणे इस्तंबूलमध्ये शूट केले गेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे गाणे को.बी.पराक यांनी कंपोज केले असून याचे बोल ‘जानी’ ने लिहले आहेत. सोनी इंडिया म्युसिकचे मुख्य पवनेश पजनु म्हणाले की, “हार्डी याची फॉलोविंग खूप मोठी आहे. जेव्हा आम्ही त्यांचे वयक्तिक गाणे रिलीज करतो तेव्हा त्यांची आशा जास्त असते. ‘क्या बात है’ हे एक रोमँटिक डान्स ट्रक आहे ज्यावर तुम्ही थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. आमचा उद्देश त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढवणे आहे. यावर्षी हार्डी हे बॉलीवूड मधील अनके गाण्याला आवाज देणार आहेत.”

या गाण्यासाठी हार्डीने त्याच्या लूकवर विशेष काम केले आह. त्याने त्याची हेअर स्टाईल बदलली असून सिक्स पॅक ऍब्स देखील कमविले आहेत. हार्डी याचे सर्व गाणे यु ट्यूब वर खूप पहिले जातात. त्याचबरोबर मुलींमध्ये त्यांची खूप क्रेज आहे.

https://www.youtube.com/watch?v=G0Hx6uN2AJE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)