पंचमहाभूते आणि आरोग्य (भाग एक)

डॉ. श्रुती कुलकर्णी  

पाच नैसर्गिक तत्वांचा समतोल म्हणजे निरोगी जीवन या पंचमहाभूतांविषयी जाणून घेऊ या. प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे की आपल्या जीवनात जर पाच नैसर्गिक तत्वांचा समतोल असेल तर आपले जीवन निरोगी जीवन राहिल. यातील एक तत्व जरी बिघडले तरी लय बिघडते आणि लय म्हणजेच शरीरातील दोष किंवा रोग बिंदू.तेंव्हा ही सर्व तत्व नीट जाणून घेणे आवश्‍यक आहे.

  तेज अर्थात प्रकाश व अग्नितत्व

तेज म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश मिळतो सूर्यापासून. अशा या सूर्याची आराधना सूर्यनमस्काराद्वारे केली जाते. त्याचवेळी विविध मंत्र म्हणून या अग्निला प्रसन्न केले जाते. अग्निहोत्र करून अग्नेय स्वहा म्हणून आहुती दिली जाते. आग्नि आणि प्रकाशाचे उपासक असे आपण तेजतत्वाची साधना करतो. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. आपणसूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी चा मुबलक साठा असतो. या व्हिटॅमिन डीमुळे रोगजंतूंचा नाश होतो. अन्न पचन होते. मूडदूस या भयानक रोग बरा व्हायला “ड’ जीवनसत्व आवश्‍यक असते. जे कोवळ्या सूर्यकिरणांद्वारे मिळते. तसेच सूर्याची कोवळी किरणे आपली हाडे मजबूत करतात. केश विकार नाहीसे करतात. त्वचा विकारही जातात. तेज, प्रकाश, उष्णता, अग्नीतत्त्व यांचे प्रतिनिधीत्व आपला अंगठा करतो. उगवता सूर्य म्हणजे आशावाद, उद्याचं स्वप्न, सकारात्मक विचार म्हणून भावनिक दृष्ट्याही या तेजाचा प्रभाव मानवी आयुष्यावर आहे. अशा तेजाची उपासना मुद्रेद्वारे करतात.

   वायुतत्व

वायुतत्व म्हणजे हवा. मोकळ्या हवेचे सध्याच्या प्रदूषणयुक्‍त जगात अतिशय महत्व आहे. शुद्ध मोकळी हवा मानवी जीवनात अत्यंत गरजेची आहे. जिवंत राहण्यासाठी लागणारा ऑक्‍सिजन या शुद्ध हवेत मिळतो. शरीरामध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा जेवढा जास्त तेवढे शरीर जास्त चैतन्यमय असते. रक्‍तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम ऑक्‍सिजन करतो. “एक शुद्ध हवा सौ रोगोंकी दवा’ असं म्हटलं जातं ते उगाच नाही.हा सृष्टीचा अलिखित नियम आहे. आपल्या शरीरातील पेशींचे ज्वलनकार्य सतत चालू रहावे म्हणून शुद्ध हवेची गरज आहे. हाताच्या अंगठ्याशेजारचे बोट म्हणजेच तर्जनी वायुतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. तर्जनीच्या सहाय्याने केलेली मुद्रा वायुतत्वाला संतुलित करते. त्यामुळे वायु मुद्रा ही वायुतत्वात लवकर योग्यप्रकारे घट करत असते. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. वायुतत्वाच्या ज्या मुद्रा आहेत प्राणमुद्रा असतात ज्या शरीरामध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा जास्त करून शरीर चेतनामय करतात.

    आकाशतत्व

आकाशतत्व म्हणजेच पोकळी, मोकळी जागा. आपल्या शरीरातल्या सर्व वाहिन्यांमध्ये पोकळी असते. शिवाय जठर आपण मोकळे ठेऊ शकतो. निसर्गनियमाप्रमाणेच अन्न घेताना जठराचा पाव भाग मोकळा ठेवला तर कधीच आजारपण येतच नाही. आकाश तत्व म्हणजे शारीरिक व मानसिक विराम अर्थात विसावा होय. विश्रांती काळात आजार बरे करण्याचे म्हणजेच हिलींग पॉवरचे सामर्थ्य असते. सध्या जमाना हिंलिग पॉवरचा आहे. निसर्ग सांगतोकी दमल्यानंतर चहाकॉफी सारखी उत्तेजक पेयं घेणं म्हणजे दमलेल्या शरीररुपी घोड्याला चाबूक मारून एकसारखे काम करवतपळवण्यासारखे आहे. त्याऐवजी थोडासा विसावा घ्यावा.

आकाशतत्वाचा प्रतिनिधी आपले मधले बोट असते. अति श्रम करणे म्हणजे अकाली वार्धक्‍य ओढवून घेणे होय. नियमितपणे केलेली पंधरा ते वीस मिनिटांची ध्यान धारणा देखील तुम्हाला कल्पना येणार नाही पण आपल्या शरीराला एकाच वेळी चार ते साडेचार तासांची विश्रांती अनाहूतपणे देऊन जाते. आपल्या शरीरातील कवटी, नाक, कान, जठराचा मोकळा भाग, वगैरे पोकळ्या आकाश तत्व सांगतात. हाताच्या मधल्या बोटाने केलेली आकाशमुद्रा शांतपणे केली असता तिचे अनेक फायदे आहेत. जी हाडांच्या विकाराबरोबरच हृदयाच्या विकारांवरही इलाज करते.

पंचमहाभूते आणि आरोग्य (भाग दोन )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)