पंक्‍चर दुचाकी ढकलत नेणाऱ्या दोघांवर काळाचा घाला

पुणे, दि.31 – पंक्‍चर दुचाकी ढकलत चाललेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना नऱ्हे येथे मध्यरात्री घडली. हे दोघेही तरुण भरधाव ट्रकच्याखाली चेंगरुण जागेवरच ठार झाले. हा अपघात इतका भीषम होता की त्यांचे ट्रकखाली अडकलेले मृतदेह पोलिसांना मोठे प्रयत्न करून बाहेर काढावे लागले. संबंधीत ट्रक चालकाला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. तो नशेच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही घटना सोमवारी मध्यरात्री नऱ्हे येथील भुमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावर घडली. संतोष छगन मेहेर (वय 22, रा. रोपडे, ता. माढा, जि. सोलापूर) व स्वप्नील सुनील देशमुख (वय 22, रा. चाकण, खेड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक उमेश नाना जावळ (वय 41, रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) यास सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री नऱ्हे येथील भुमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावर घडली.
संतोष व स्वप्नील हे दोघेही एका पॅथलॅबमध्ये कामाला होते. रुग्णांकडून रक्तसंकलन करून ते पॅथलॅबमध्ये घेऊन जाणे आणि त्याचा अहवाल रुग्णांना देण्याचे काम करत होते. सोमवारी रात्री काम उरकून ते दोघेही जेवायला गेले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून त्यांच्या घरी निघाले होते. भुमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावरून जात असताना त्यांची दुचाकी पंक्‍चर झाली. उशीर झाल्यामुळे पंक्‍चरची दुकानेही बंद झाली होती. त्यामुळे दोघेजण दुचाकी ढकलत घेऊन जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एम एच 11, एएल 438) येताना त्यांना दिसला. त्यांना ट्रक अंगावर येत असल्याची कल्पना आली होती. यामुळे त्यांनी ट्रकचालकाला हाताने तसा इशाराही केला होता. मात्र ट्रकचालक इतका नशेत होता की त्याने दोघांनाही ट्रकखाली चिरडले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तेथे धाव घेतली. दरम्यान, रात्र गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, पांडुरंग वांजळे, सुनील पवार, कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चालकास तत्काळ ताब्यात घेतले. ट्रकखाली चिरडले गेल्याने दोन्ही तरुणांचा चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना त्यांचे मृतदेह ट्रकच्या चाकाखालून काढताना मोठे प्रयत्न करावे लागले. रस्त्यावरून जाणारा दुसरा ट्रक थांबवून त्याच्याकडील स्पॅनरचा वापर करून ट्रकचे चाक खोलल्यावर मृतदेह बाहेर काढता आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)