“न्यूटन’ च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल

राजकुमार रावच्या “न्यूटन’समोर आता कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सीआरपीएफ अर्थात “सेंत्रल रिझर्व पोलिस फोर्स’ची चुकीची प्रतिमा उभी केल्याबद्दल “न्यूटन’च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. “सीआरपीएफ’च्याच एका सब इन्स्पेक्‍टरने “न्यूटन’च्या निर्मात्यांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीतल्या एका कोर्टाने ही तक्रार दाखलही करून घेतली आहे. तक्रारदार सबइन्स्पेक्‍टरला पुराव्यांसह 19 मे रोजीच्या सुनावणीला दाखल होण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. यापूर्वीही इराणी सिनेमा “सिक्रेट बॅलेट’ची कथा चोरल्याचा आरोप “न्यूटन’च्या निर्मात्यांवर झाला होता. मात्र “न्यूटन’ हा सिनेमा सगळ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला आहे आणि सिनेमाला ऍवॉर्डही मिळाले आहेत.

जर कथा कॉपी केलेली असती तर ऍवॉर्ड मिळाले असते का? असा प्रश्‍न दिग्दर्शक अमित मसुरकरनी उपस्थित केला होता. “सिक्रेट बॅलेट’ हा सिनेमा किंवा त्याच्या कथेबद्दल आपल्याला माहितीही नाही. जेंव्हा कथा कॉपी केल्याचा आरोप झाला, तेंव्हाच आपल्याला या सिनेमाबद्दल समजले असे मसुरकर म्हणाले. “न्यूटन’ला यावर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. मात्र अंतिम फेरीपर्यंत “न्यूटन’जाऊ शकला नव्हता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)