न्यूझीलंडची राखीव फळी तपासण्याची संधी – केन विलियम्सन

वेलिंग्टन: भारताविरुद्धच्या टी- 20 मालिकेत अनुभवी मार्टिन गुप्टिल आणि अन्य काही खेळाडू संघात सामील नसल्याने आम्हाला आमची राखीव फळी तपासण्याची उत्तम संधी असून बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव नवोदीत खेळाडूंना मिळणार आहे, असे वक्तव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने केले आहे.

न्यूझीलंडने टी- 20 सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. त्यात अष्टपैलू खेळाडू डेरेल मिचेल आणि जलदगती गोलंदाज ब्लेअर टिकनर यांना पदार्पणाची संधी आहे तर एक सामना खेळण्याचा अनुभव असणारा स्कॉट कुगगेल्लिजेन आणि 8 सामन्यांचा अनुभव असणारा टीम सेईफर्ट यांचा देखील संघात समावेश आहे.

विलियम्स म्हणाला, गुप्टील पाठदुखीच्या आजारातून तंदुरुस्त झालेला नाही. तर काही अनोंदीत खेळाडूंना या मालिकेत संधी मिळणार आहे. आम्ही खेळपट्टीचे स्वरूप पाहून संघ निवडीचा विचार करणार आहोत. त्यामुळे संघात नेहमी बदल दिसु शकतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)