न्युमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू

कुसूरजवळ मृतावस्थेत आढळला

ढेबेवाडी, दि. 26 (प्रतिनिधी) – कुसूर, ता. कराड येथे मृत अवस्थेत बिबट्या आढळला असून कुसुर येथील बी नावाच्या शिवारात आढला व वनविभागाने त्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत वन विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार कुसूर गावाच्या हद्दीत डोंगर पठारावर बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आला. नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधून याची माहिती दिल्यानंतर कराड वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल डॉ. साजणे, कोळे येथील वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक कविता रासवे, अरुण शिबे, म्हासोलीचे वनरक्षक राठोड हे तातडीने पठारावर दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेवून नागरिकांच्या मदतीने खाली आणला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खैरमोडे, डॉ. विनोद पाटील यांनी शवविच्छेदन केले. त्यास न्युमोनिया झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल डॉ. साजणे व वनपाल सुभाष पाटील यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)