नौसेनेचा गणवेश घालून फिरणाऱ्या भामट्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे – भारतीय नौसेनेचा गणवेश परिधान करून फिरणाऱ्या भामट्याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.आर.जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
राजन जनार्दन शर्मा (वय 23, रा. सिध्दार्थनगर, शैलेश टॉवर सदनिका क्र. 13, औंध, मुळ रा. पश्‍चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस नाईक दादासो हनुमंत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. औंध येथील एका सोसायटीमध्ये एक व्यक्ती नौसेनेचा गणवेश परिधान करून राहत आहे. तसेच तो सध्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभा असल्याची माहिती गुरूवारी (दि.26 जुलै) सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत शर्मा याला अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)