नो बॉलच्या पुढं – आऊट नाही, पण गेला तर षटकार! (भाग-१)

परवाचीच गोष्ट, पत्नीसमवेत एका वस्तूची खरेदी करण्यासाठी आख्खं इलेक्ट्रिक मार्केट फिरलो. सर्व ठिकाणी किमतीत ५०-१०० रुपयांचाच फरक होता परंतु आमची खरेदी झाली ती सर्वांत कमी भाव सांगणाऱ्याच्या दुकानात नाही तर त्याच्यापेक्षा जास्त भाव सांगितल्या गेलेल्या दुकानातून. आता प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे, असे का ? कारण पुणेरी स्टाईलप्रमाणे प्रत्येक गोष्टीत घासाघीस केल्याशिवाय आम्हाला ती गोष्ट घेतल्याचं समाधान मिळत नाही. तर मग आम्ही (येथे ‘मी’ फारच गौण आहे; दोन्ही अर्थानं) ती वस्तू तेथेच का घेतली याचं उत्तर होतंत्या वस्तूबरोबर मिळणारी गॅरेंटी. एका नावाजलेल्या ब्रँडची वस्तू आम्हांस १ वर्ष गॅरेंटी देत होती तर दुसरी एक नावाजलेली कंपनी आपल्या उत्पादनावर २ वर्षांची गॅरेंटी देत होती. आम्ही घेतलेली वस्तू जरी अठराशे रुपयांची होती तरी ५० रुपये जास्त मोजून २ वर्षं गॅरेंटी असणारंच उत्पादन आम्ही आग्रहानं खरेदी केलं, निव्वळ गॅरेंटीपोटी, अर्थातच दोनही उत्पादनांचा दर्जा सारखाच होता. जर अठराशे किमतीच्या वस्तू खरेदीत आपण दोन वर्षांची गॅरेंटी देणाऱ्या कंपनीचं उत्पादनच थोडसं महाग असून देखील निवडतो तर मग लाखो-करोडो रुपयांच्या बाबतीत आपण हलगर्जीपणा का दाखवतो ? आपले गुंतवणूक पर्याय निवडताना सर्वप्रथम ते सरकारमान्य आहेत का व त्यावर कोणतं सरकारी प्राधिकरण व्यवस्थापन लक्ष ठेऊन आहे, ते तपासा. उदा. बँक व तत्सम गुंतवणुकीसाठी आर.बी.आय.,शेअर्स, म्युच्युअल फंड्स इ. साठी सेबी, इन्शुरन्स साठी आयआरडीए व रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी रेरा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक ठिकाणी जेव्हा लोकांना प्रश्न विचारले जातात की, सर्वांत सुरक्षित गुंतवणूक कोणती तर ९०-९५% लोक सर्रासपणे एकच उत्तर देतात ते म्हणजे, ‘बँक एफडी’. त्यांना एकतर गुंतवणुकीच्या इतर साधनांची ओळख नसते अथवा ते आपल्याच गृहीतकास चिकटून त्याच (गैर) समजात त्यांना राहण्यास आवडते.खालील तक्त्यात आपण कांही प्रमुख गुंतवणूक पर्याय, त्यांचे परतावे व मुद्दलाची गॅरेंटी यांवर प्रकाश टाकू.

नो बॉलच्या पुढं – आऊट नाही, पण गेला तर षटकार! (भाग-२)

वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे सर्वांत जास्त परतावा हा सेन्सेक्सनं दिलेला आहे, त्याचप्रमाणं शेअर्समधील गुंतवणुकीत मुद्दलाची कोणतीच शाश्वती नसते आपण जाणूनच आहात. तर रिअल इस्टेट या प्रकारातील गुंतवणूक ही सर्वकष नसल्यानं म्हणजेच पुण्यातील एखाद्या प्लॉट अथवा फ्लॅटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मापदंड हे हरियाणातील गुरुग्राम येथील गुंतवणुकीबाबत किंवा एखाद्या समुद्र किनाऱ्याजवळील जागेसंदर्भातील गुंतवणुकीबाबत नक्कीच मिळतेजुळते नसतील त्यामुळं त्याचा परतावा हा वेगवेगळा असल्यानं ती गुंतवणूक गृहीत धरत नाहीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)