नो बॉलच्या पुढं – आऊट नाही, पण गेला तर षटकार! (भाग-२)

नो बॉलच्या पुढं – आऊट नाही, पण गेला तर षटकार! (भाग-१)

मागील आठवड्यात म्हटल्याप्रमाणं असा एक गुंतवणूक पर्याय आज देखील उपलब्ध आहे जो शेअर बाजाराशी निगडीत आहे, ज्यात कमीत कमी परतावा हा द.सा.द.शे. ६ % आहे व जास्तीत जास्त परतावा हा बेंचमार्क म्हणजे निफ्टी५०प्रमाणे असेल. म्हणजे पुढील साडेतीनवर्षात निफ्टी५० येथून ३ पट झाल्यास या गुंतवणूक पर्यायातून मिळणारा परतावा देखील आजच्या तिप्पटच असणार आहे. परंतु, जर पुढील पाच वर्षांत निफ्टी५० आतापेक्षा ३० टक्क्यांनी घसरला तरी देखील आपल्या गुंतवणुकीवर मात्र द.सा.द.शे. ६% टक्के हिशोबानेपरतावा हा मिळणारच आहे. तेही आपल्या मूळ मुद्दलास कोणताही धक्का न लागता. होय, वाचलेलं हे खरंय. म्हणजेच परताव्याच्या वरील बाजूस कोणतेही निर्बंध नसणार आहेत, जितकी वाढ निफ्टी ५० दर्शवेल तितकीच वृद्धी तुमच्या गुंतवणुकीची देखील होणार आहे परंतु (निफ्टी५०) पडत्या बाजूस कोणतीही जोखीम नसून परतावा मात्र निश्चित आहे. खालील बाजू संरक्षित व उर्ध्व बाजूस अवकाश भरारी ! ही कोणतीही पॉन्झी स्कीम नसून भारतातील अनेकनोंदणीकृत अशा अग्रगण्य कंपन्या बाजारात अशा संरचीत प्रकारच्या गोष्टी आणत आहेत ज्या पूर्णतः सरकारमान्य (सेबी रेगुलराईझ्ड) सुरक्षित आहेत फक्त त्याचा गवगवा नसल्यानं त्या फारशा कोणाला माहीत नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या गुंतवणूक पर्यायाची वैशिष्ट्यं –

– आपल्याकडं एक गुंतवणूकदार वर्ग असा देखील आहे जे एकवेळ कमी परताव्यास प्राधान्य देतात परंतु त्यांना जोखीम अजिबात नको असते, अशांसाठी अगदी चपखल असा हा गुंतवणूक पर्याय आहे.

– डेब्ट व इक्विटी यांचं योग्य मिश्रण.

– दीर्घ मुदत नफा कर (LTCG) हा केवळ १० %.त्यामुळं जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास अतिरिक्त कर नाही.

– टीडीएस कापला जात नाही.

–  गुंतवणूक कालावधी : ४२ महिने

– AA रेटिंग

– ‘सेबी’ च्या आधीन असलेला पर्याय.

– ज्यांना येथून पुढील साडेतीन वर्षं बाजारात राहून बाजार वरती गेल्यास त्याप्रमाणं उच्च परतावा हवा आहे परंतु अजिबात जोखीम पत्करायची तयारी नाहीय अशांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

– हा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीस सरकारनं नेमणूक केलेल्या ट्रस्टीकडं (सरकारी बँकेकडं) गुंतवणूकदारांनी केलेल्या रक्कमेइतकी रक्कम व त्याजबरोबरीनं व्याजाची रक्कम आगाऊ जमा करावी लागते. ज्यामुळं केलेल्या गुंतवणुकीबद्दल कोणतीही जोखीम नसते.

आता अगदी थोडक्यात समजून घेऊ की या पर्यायामध्ये परतावा कसा मोजतात ?

या गुंतवणूक पर्यायाचा कालावधी ४२ महिन्यांचा आहे त्यामुळं निफ्टी५० ची शेवटच्या ६ महिन्यांच्या  (म्हणजे ३७वा महिना ते ४२वा महिना) बंद भावाची सरासरी ठरवली जाईल व त्याच्या टक्केवारीनुसार या गोष्टीचा परतावा निश्चित होईल. उदा. शेवटच्या ६ महिन्यातील निफ्टी५०च्या बंद भावांची सरासरी म्हणजे १७००० आल्यास ती परताव्यासाठी मापक म्हणून गृहीत धरली जाईल. आजचा निफ्टी५० चा बंद भाव जर १०८५० गृहीत धरला तर ही वाढ ५६.६८ % होते. त्याप्रमाणं केलेल्या गुंतवणुकीवर साडेतीन महिन्याच्या मुदतीत गुंतवणूकदारास ५६.६८% परतावा मिळेल. म्हणजेच १० लाख कोणी या धोरणात गुंतवणूक केले असतील तर सरतेशेवटी त्यास एकूण १५,६६,८,०० रुपये मिळतील. परंतु जर मुदतीच्या शेवटच्या ६ महिन्यांची सरासरी ही जर निफ्टीच्या वार्षिक ६ टक्के दरानं चक्रवाढ व्याजाच्या दरापेक्षा (साधारणपणे १३३०९) खाली राहिल्यास (अगदी निफ्टी १०००० आली तरीही) मूळ मुद्दलीमधून एक रुपयाही कमी न होता सरतेशेवटी ६% व्यजदारानं साडेतीन वर्षांचं व्याज मिळेल). यालाच म्हणतातवन डेमध्ये नो बॉल नंतरचा बॉल खेळायला मिळणं. आऊट न होण्याची शाश्वती व षटकार गेल्यास सहा धावा देखील नांवावर.. आहे ना इंटरेस्टिंग ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)