नोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी

विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सपशेल अपयशी
नवी दिल्ली – नोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब झाला आहे. प्रॉपर्टींचे दर खाली आले आहेत. यूपीएच्या राजवटीत गृहकर्जावरील व्याजदर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होता. तोही आता कमी झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले.

मोदींनी नमोऍपवरून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या विविध प्रश्‍नांचीही उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एकप्रकारे नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादात त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. मागील चार वर्षांत कॉंग्रेसचा जनतेबरोबरचा संबंध तुटला आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सपशेल अपयशी ठरला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटे आरोप करणे आणि बनावट बातम्या पसरवणे हा त्या पक्षाचा एकमेव अजेंडा बनला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मीडियाच्या विविध स्वरूपांचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचावे. त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडून कॉंग्रेसच्या खोट्या आरोपांवर आधारित प्रचाराला प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन मोदींनी केले. कॉंग्रेसची केंद्रातील राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. कुठलीही व्हिजन (दूरदृष्टी) नसलेले लोक सध्या टेलिव्हिजन (टीव्ही) बनले आहेत. त्या टीव्हीवर सातत्याने कॉमेडी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला.

सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून आमच्या सरकारने मागील चार वर्षांत सर्व वर्गांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत केले. मागील राजवटीत जनतेला महागाई भेडसावत होती याची आठवण तुम्हाला असेल. आमच्या कार्यकाळात नक्षलग्रस्त भागांमधील हिंसाचार 20 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सरकारच्या धोरणांमुळे आणि विकासामुळे चार वर्षांच्या कालावधीत सुमारे 3 हजार 500 नक्षलवादी शरण आले, असेही मोदींनी नमूूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)