नोटबंदीमुळे कर संकलन आणि विकासातही वाढ

File photo..

अर्थमंत्री अरुण जेटली

नवी दिल्ली – गेल्यावर्षी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे अर्थकारणाला औपचारिक स्वरुप प्राप्त झाले. तसेच करसंकलन वाढले आणि विकासालाही चालना मिळाली, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. नोटबंदीदरम्यान बाद झालेल्या बहुतेक सर्व नोटा बॅंकांमध्ये परत जमा करण्यात आल्याचे रिझर्व बॅंकेच्या दुसऱ्यांदा प्रसिद्ध झालेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर जेटली बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चलनातून बाद झालेल्या बहुतेक नोटा जमा करण्यात आल्यामुळे नोटबंदीचा मुख्य हेतू साध्य झाला नाही, असा प्राथमिक दावा करण्यात येतो आहे. या संदर्भात बोलताना “जमा न झालेल्या नोटा चलनातून बाद करणे हा नोटबंदीचा एकमेव हेतू नव्हता.’ असे जेटली म्हणाले.

करबुडवेगिरीतून बाहेर पडून कर भरणा करणारा देश व्हावा, हा नोटबंदीचा प्रमुख हेतू होता. त्यासाठी अर्थकारण औपचारिक होणे आणि काळा पैसा उघड होणे गरजेचे होते, असेही जेटली म्हणाले.

अर्थकारण औपचारिक होणे हा नोटबंदीचा हा एक मोठा सकारात्मक परिणाम आहे. अर्थकारण जास्ती औपचारिक झाल्याने व्यवस्थेमध्ये अधिक जास्त पैसा आला. सहाजिकच करातून मिळणारा महसूल, खर्च आणि विकासही वाढला आहे. पहिल्या दोन तिमाहीमध्येच हा परिणाम दिसून आल्याचे जेटली यांनी सांगितले.

जमा होणाऱ्या आयकरात वाढ
नोटबंदीच्या पूर्वीच्या दोन वर्षात आयकर जमा होण्यातील वाढ 6.6 ते 9 टक्के होती. मात्र नोटबंदीनंतर आयकराची वाढ 15 टक्के आणि आगामी दोन वर्षातील हीच वाढ 18 टक्के आहे. हीच वाढ तिसऱ्या वर्षातही दिसून येते आहे. मार्च 2014 मध्ये 3.8 कोटी आयकर विवरण दाखल झाले. तर 2017-18 मध्ये हे प्रमाण वाढून 6.86 कोटी इतके झाले. गेल्या दोन वर्षात नोटबंदी आणि इतर उपाय योजनांच्या परिणांमुळे आयकर विवरणामध्ये 19 टक्के आणि 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसते आहे, असे जेटली म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)