नोकरी मागणारे नाही तर देणारे बना

स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशकुमार यांचे आवाहन

गुरूनाथ जाधव
सातारा, दि. 29
युवकांनो नोकरी मागणारे नाही तर स्वत: नोकऱ्या देणारे बना असे आवाहन स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशकुमार यांनी केले. सातारा येथील शकुनी गणपती मंदिरा जवळील, नाना पालकर भवनामध्ये रोजगाराची समस्या आणि उपाय या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी, स्वदेशी जागरण मंचचे प्रांत सह संयोजक सुहास यादव, महाराष्ट्र संघटक राजू क्षीरसागर, जिल्हा सहसंयोजक हेमंत साठे, दिलीप बोरकर व सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतामध्ये रोजगाराच्या समस्या का निर्माण झाल्या आहेत. याबाबत युवकांनी आत्मचिंतन करणे अत्यावश्‍यक बनले आहे. भारताला महासत्ता बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होणे आवश्‍यकच आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या देशाची पुर्वपरंपरा आपण विसरत चाललो आहोत. उच्च नोकरी, मध्यम व्यवसाय कनिष्ठ शेती या ब्रिटिशांनी घालून दिलेल्या सुत्राचा अवलंब आपल्याला स्वयं रोजगारापासून दूर लोटत आहे. ब्रिटिशांनी आपल्या सर्व पंरपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या. कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशामध्ये आज शेती करण्यासाठी युवक तयार होत नाहीत याबाबत खंत वाटते.

सतीशकुमार म्हणाले,आपण कधीच याचा विचार करत नाही कि स्वदेशी वस्तू, उत्पादने आपल्या लोकांकरिता रास्त दरात दिल्यास आपण रोजगार निर्मिती करू शकतो. आणि ते करणे अत्यंत गरजेचे आहे. आज इतर देशांमध्ये स्वायतत्तेसाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.आशियाई देशांमध्ये राष्ट्रवादानेच परिवर्तन होऊ शकते.भारतीय युवकांनी पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा रोजगार निर्मितीकडे वळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हा स्वदेशी जागरण मंचचा उद्देश आहे.

फारसे कौशल्य आणि पदवी नसतानाही कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या व स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्यांचे अनुभव कथन ऐकताना आपण देखील व्यवसाय करू शकता असा आत्मविश्वास निर्माण होतो. लघु व कुटीर उद्योग प्रक्रिया उद्योगांची कास युवकांनी धरली पाहिजे. इतर देशामध्ये जाहिरात, आकर्षक पॅकेजींग उत्पादन विक्री विपणण कौशल्ये अवलंब करून आपल्या देशातील पैसा त्यांच्याकडे खेचतात. यामध्ये आपण काय केले पाहिजे याबाबत त्यांनी विविध उदाहरणे व्याख्यानात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)