पिंपरी – नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
नीलेश शिवाजी हेब्बाळकर (वय-26, रा. काटेवस्ती, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भगीरथ सुरेशचंद्र त्यागी (वय-28), झाकिर हुसेनअली खान (वय-35, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर 2017 ते 14 फेब्रुवारी 2018 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी हेब्बाळकर यांच्या मोबाईलवर फोन केला. नोकरी देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना तीन बॅंकांच्या खात्यावर वेळोवेळी एक लाख 54 हजार 570 रुपये भरण्यास सांगितले. तसेच पैसे परत न देता व नोकरी न देता फसवणूक केली. आरोपींना मुंबईतील पायधुणी पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाल्यावर हेब्बाळकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक निरीक्षक संजय निकुंभ अधिक तपास करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा