नोकरशहांकडे गरजेपेक्षा जास्त अधिकार – रघुराम राजन

बॅंकांचे व्यवस्थापन कार्यक्षम व्यक्‍तीकडे हवे ; नोकरशहांचा बॅंकांतील हस्तक्षेप कमी करण्याची गरज

दावोस: रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील नोकरशहांवर टीका केली आहे. आर्थिक सुधारणा अपयशी ठरण्यात नोकरशहांचा फार मोठा हात आहे, अशा शब्दांमध्ये राजन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बरसले. नोकरशहांमुळे आर्थिक सुधारणांचा गाडा पुढे जाण्यात अडथळे येतात, असे मत त्यांनी मांडले. सध्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना फार अधिकार नाहीत. त्या तुलनेत नोकरशहांच्या हातात जास्त अधिकार असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाबद्दल राजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी नोकरशहा आणि त्यांची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली.

सरकारी बॅंकांमधील हस्तक्षेप थांबायला हवा. कोणत्याही नोकरशहापेक्षा एखाद्या पात्र व्यक्तीकडे बॅंकांचे नेतृत्व सोपवायला हवे. बॅंक चालवण्यासाठी नोकरशहा पर्याय असू शकत नाही. बॅंकांची धुरा योग्य व्यक्तींकडेच द्यायला हवी, असे परखड मत राजन यांनी व्यक्त केले.

राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेतील त्यांचा अनुभवदेखील यावेळी सांगितला. गव्हर्नर म्हणून काम करताना अनेक प्रकारचे नोकरशहा भेटले. त्यामुळे वेगवेगळे अनुभव आले.

या काळात काही चांगले अनेक अधिकारी भेटले. तर अनेक अधिकारी असेही होते, ज्यांना सुधारणांसाठी केलेले प्रयत्न समस्या वाटायचे, असा अनुभव राजन यांनी बोलून दाखवला. सध्याच्या देशात मंत्र्यांची भूमिका नोकरशहा पार पाडत आहेत. खरेतर मंत्र्यांनी नोकरशहांना आदेश द्यायला हवेत. मात्र, सध्याच्या केंद्र सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्यांऐवजी नोकरशहा सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, असे आपले निरीक्षणही त्यांनी पत्रकाराशी बोलताना नोंदवले आहे.1991 मधील सुधारणांनंतर नोकरशाहीच्या रचनेत जो बदल अपेक्षित होता तो झालेला नाही, तो आतातरी होण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)