नेहा धुपियाचा बेबी बंपसह कॅटवॉक

नेहा धुपियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचे बेबी बंपसहीत फोटो पोस्ट करून चाहत्यांना “गुड न्यूज’ दिली आहे. गुड न्यूज जाहीर करताच नेहा व अंगद लॅक्‍मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हलमध्येही सहभागी झाले होते. या फॅशन शो मध्ये नेहा आपल्या बेबी बंपसह अंगदसोबत रॅम्पवर कॅटवॉक करत सहभागी झाले होते. डिजायनर पायल सिंघलचे कलेक्‍शन त्यांनी प्रेझेंट केले होते. या कलेक्‍शनलाही “द शो स्टॉपिंग ब्राईड कलेक्‍शन’ असे सार्थक नाव दिले गेले होत. फॅशन इव्हेंटमध्येच अंगद आपल्या बायकोची किती काळजी घेतो आहे, हे सगळ्यांना दिसले. सध्या नेहाला त्याच्या याच आधाराची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, 10 मे रोजी नेहा आणि अंगद बेदी यांनी एका गुरुद्वारामध्ये गुपचूप लग्न उरकले होते. तिच्या लग्नानंतर दोनच महिन्यांपासून तिच्याकडे “गुड न्यूज’ असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, तिने किंवा नवरा अंगद बेदी यांच्यापैकी कोणीही त्याबाबत उघडपणे कोणतेही कन्फर्मेशन दिलेले नव्हते. मात्र, आता तिने स्वतः ही चर्चा थांबवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)