नेहरू युवा केंद्रामार्फत रेल्वेस्टेशन येथे स्वच्छता अभियान उत्साहात

सातारा- नेहरू युवा केंद्र सातारा (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार) आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी सातारा यांच्या संयुक्‍त विद्यमाने, स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत शुक्रवारी सातारा रेल्वेस्टेशन येथे प्लॅटफॉर्म स्वच्छता व रेल्वे स्टेशनचा आजुबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी स्टेशनमास्तर एम. मीना, रेल्वे पोलिस ए. पी. आय. अल्लाउद्दीन बागवान, तांत्रिक शाखा प्रमुख अलेक्‍झांडर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भानुदास यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

रेल्वे स्टेशनच्या परिसरातील उपस्थित प्रवासी आणि एमएसडब्ल्यू महाविद्यालयातील युवक, युवती, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली. तसेच रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सुमित काळे एमएसडब्ल्यू दोन तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास यादव अकाऊंट ऑफिसर नेहरू युवा केंद्र सातारा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राष्ट्रीय युवा स्वयंसेवक – कोरेगाव रमेश पुजारी, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक शाहरूख मुजावर, भावना काटकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र सातारा अक्षय माने, रोहित गायकवाड, राज सावंत, अक्षय गोळे, रविंद्र पाटकर, भावना मोहारे, अमर साळुंखे, सुमित चव्हाण अजित दडस तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)