नेहरुंनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी स्वयंसेवकांना आमंत्रित केले होते – संघ

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. याबद्दल काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. मुखर्जींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण का स्विकारले, अशी जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचाही समावेश झाला आहे. नेहरुंनी 1963 मध्ये संघाच्या 3 हजार स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते, असे संघाने म्हटले आहे. नेहरु संघाच्या सामाजिक कार्यामुळे प्रभावित झाले होते, असे संघाच्या नॅशनल मीडिया टीमचे सदस्य रतन शारदा यांनी म्हटले आहे.

1962 च्या युद्धावेळी संघाच्या कार्यकर्त्यांनी सीमेवर खूप काम केले होते, असे रतन शारदा म्हणाले. ‘स्वयंसेवकांनी केलेल्या कामामुळे नेहरु खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी संचलनासाठी संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केले होते. त्यांनी आणखी काही स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांनादेखील संचलनासाठी आमंत्रित केले होते. मात्र चीनविरुद्धच्या युद्धातील नेहरुंच्या भूमिकेवर अनेकजण नाराज होते. त्यामुळे त्यांनी संचलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला,’ असे शारदा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी घेतला होता, असे शारदा म्हणाले. ‘आम्हाला संचलनाच्या काही आठवड्यांपूर्वीच आमंत्रण देण्यात आलं. मात्र आम्ही संचलनात सहभागी झालो,’ असे शारदा म्हणाले. संघ मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. त्यावरुन त्यांच्यावर टीका होतेय. यावरही शारदा यांनी भाष्य केले. मुखर्जींवरील टीका अनाठायी असल्याचे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)