नेहमीच नवऱ्याचे ऐकत नाही माधुरी

माधुरी दीक्षित नेनेचा पहिला मराठी सिनेमा “बकेट लीस्ट’ गेल्या आठवड्यात रिलीज झाला. यानिमित्ताने तिने प्रथमच आपल्या कौटुंबिक वातावरणाविषयी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. अमेरिकेतून भारतात स्थायिक झालेल्या माधुरीला भारतातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या कुटुंबासह जुळवून घेताना खूप अडचणीचे होते आहे. तिचे पतीदेव डॉ. श्रीराम नेनेनी तर लग्नापर्यंत तिचा एकही सिनेमा बघितलेला नव्हता. तिच्या मुलांनाही फिल्म इंडस्ट्रीबाबत विशेष आकर्षण नाही. दोन्ही मुलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणीच मित्र नाहीत. माधुरी जेंव्हा जेंव्हा आपल्या मुलांना एखाद्या सिनेमाशी संबंधी पार्टीला बरोबर चलण्याविषयी विचारते, तेंव्हा ते चक्क नकार देतात. आजच्या जनरेशनच्या मुलांपेक्षा तिची दोन्ही मुले मोठी आहेत. शाहरुख आणि आमिर खानची मुलेही तिच्या मुलांपेक्षा मोठी आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचे कोणी नसल्याने त्यांना अशा पार्ट्यांमध्ये बोअर व्हायला होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. नेने आणि माधुरीच्या लग्नाला 20 वर्षे होऊन गेली. पण दोघांमधील रोमॅंटिक फिलींग अजूनही कायम आहे. दोघेही आपापल्या प्रोफेशनल कमिटमेंटस सांभाळून पर्सनल लाईफलाही वेळ देत असतात. काही दिवसांपूर्वीच तिच्या सगळ्या कुटुंबाने सर्फिंग शिकायचा आनंदही घेतला. अशी एखादी ट्रीप फॅमिलीसाठी आवश्‍यकच असते. नवरा बायकोमध्ये स्वाभाविकपणे जेवढे मतभेद असू शकतात, तेवढे या दोघांमध्येही होतात. पण तो मुद्दा दोघेही ताणत नाहीत. दिवस संपला की कालचे भांडण विसरून पुन्हा पूर्वीसारखे वागणे दोघांनाही चांगले अवगत आहे.

रामचा सल्ला आपल्यासाठी खूपच मौल्यवान असतो. बऱ्याचवेळा त्याच्या सल्लानुसार वागण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र तरिही प्रत्येकवेळी आपण आपल्या नवऱ्याचा प्रत्येक सल्ला मानत नसल्याचेही माधुरीने सांगितले. तिच्या फॅमिलीमध्ये “सिनेमा’ या विषयामध्ये कोणालाही फारसा रस नसल्याचेच तिच्या बोलण्यातून जाणवते. त्यामुळे सहाजिकच तिच्याशी शेअरींग करणाऱ्या नवऱ्याचा दृष्टीकोन वेगळा असणारच. “बकेट लीस्ट’मधील माधुरी ही खऱ्या जीवनातली माधुरीच आहे की काय, असा भास यामुळे वाटायला लागतो.

माधुरीचा पुढचा “कलंक’ सिनेमा संजय दत्त, आलिया भट, वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हा बरोबर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)