नेरे-चिंचवड पीएमपी सेवा सुरू

प्रजासत्ताकदिनी शुभारंभ : लकरच आळंदीसाठी बस धावणार

हिंजवडी- हिंजवडी-माण या आयटीच्या झगमगाटापासून थोडेसे दूर असलेल्या नेरे (ता. मुळशी) या गावामध्ये प्रजासत्ताक दिनी पीएमपीची सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे खऱ्या प्रजासत्ताक राज्यात राहत असल्याची भावना यानिमित्ताने प्रकर्षाने जागृत झाल्याचे नेरे ग्रामस्थांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते या बससेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. सरपंच कविता जाधव, माजी सरपंच दीपाली जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जाधव, विदूरनाना जाधव, नेरे ग्रामस्थ राहुल जाधव यांच्या प्रयत्नातून आणि नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ही नेरेगाव ते चिंचवड अशी बस सेवा सुरू झाली आहे.
गावातील जनतेसार्ठी एक अत्यंत निकडीची मूलभूत गरज म्हणून बसची आवशकता होती. या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी शाळकरी मुले आणि गावकऱ्यांना खूपच अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण आता दूर झाली आहे. 335 नंबरची ही बस पुनावळे, जांबेगाव मार्गे प्रवास करणार आहे. त्यामुळे या गावातील लोकांची देखिल सोय होणार आहे. महापौर जाधव म्हणाले की, भविष्यात लवकरच नेरे ते आळंदी अशी बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दत्ता जाधव, सदस्या विद्या जाधव, अशोक ओव्हाळ, उपसरपंच संजय जाधव, संपत जाधव, राजेंद्र सुर्वे, साहेबराव जाधव, भैरवनाथ पतसंस्था अध्यक्ष गणेश शिंदे, तुकाराम जाधव, सचिन शिंदे, संगिता जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस मित्र संघटना अध्यक्ष संदिप जाधव यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)