नेप्ती चौकात उभारणार गरुडशिल्प

महापौर सुरेखा कदम – शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या संकल्पनेतून मनपा करणार सुशोभिकरण
नगर – नेप्ती चौकात चौकात नव्याने 20 फूट उंचीचे गरुडशिल्प शिल्प उभारण्यात येणार आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून हे शिल्प साकारण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशी पध्दतीने या शिल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर सुरेखाताई कदम यांनी दिली.
शहरातील विविध भागात विकासकामे होत असताना परिसर सुशोभिकरणासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रमुख चौकामध्ये सुशोभिकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहे. नेप्तीचौक सुशोभिकरणाचे कामासाठी करण्यात आलेले बांधकाम अर्धवट अवस्थेत होते. रहदारीला अडथळा होत असल्याने व त्याभोवती अतिक्रमणे होत असल्याने काही महिन्यापूर्वीच प्रशासनाने ते हटवले होते .या जागेवर आता नव्याने शिल्पाची उभारणी करण्याचा प्रस्ताव होता. याबाबत पाठपुरावा करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शहरात प्रवेश करणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने सुशोभिकरणानंतर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
कल्पतरू एंटरप्राईजेसच्या सहकार्याने व शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून याचौकात कल्पतरूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासनेकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा करारनामाही संबंधित संस्थेबरोबर करण्यात आलेला आहे.
लवकरच या कामास सुरूवात होणार आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली व उपमहापौर अनिल बोरुडे, सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते गणेश कवडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनिता मुदगल, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व मनपा प्रशासनातील अधिकारी यांच्या सहकार्याने शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.
नेप्तीचौकाचे सुशोभिकरण करण्याकरिता कल्पतरू फिरोदिया एंटरप्राईजेस या संस्थेला महापौर सुरेखा कदम व सभागृह नेते गणेश कवडे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले असून, लवकरच सदर चौकाचे सुशोभिकरण करण्याबाबत सूचित केले आहे. या चौकात शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी 20 फुट रुंद असा सुंदर व भव्य गरूडाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना गटनेते संजय शेंडगे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक योगीराज गाडे, दत्तात्रय मुदगल, सुरेश तिवारी आदी पस्थित होते.

गणेश कवडे यांच्या पाठपुराव्याला यश
आर्थिक व प्रशासकीय अडचणीमधून मार्ग काढत कामे मार्गी लावण्यात येत आहेत. भविष्यात शहरातील इतर चौकामध्येही खाजगीकरणाच्या माध्यमातून चौक सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. नेप्ती चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी सभागृह नेते गणेश कवडे तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती सुनीता मुदगल यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)