नेपाळमध्ये पोर्नोग्राफिक साईटवर बंदी

काठमांडू – देशातील बलात्कारांच्या वाढत्या घटनांमुळे नेपाळ सरकारने पोर्नोग्राफिक साईटवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. ‘पोर्नोग्राफिक’ व्हिडिओ आणि माहितीच्या उत्पादन आणि प्रसारावर ‘गुन्हेगारी संहिता 2071 कलम 121’ आणि इतर कायद्यान्वये हा प्रतिबंध आहे. याचा प्रसार इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांद्वारे होण्यापासून थांबविण्यासाठी अशा वेबसाइट्‌सवर नेपाळमध्ये बंदी आणणे गरजेचे असल्याचे मंत्रालयाकडून जारी परिपत्रकात सांगितले आहे.

नेपाळच्या दक्षिणेकडील भागामध्ये नुकताच एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून देशातील जनतेचा रोष सरकारला झेलावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर ‘पोर्नोग्राफिक’ वेबसाईट्‌सवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)