‘नेट’ जून महिन्यात होणार

पुणे – वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणारी “यूजीसी-नेट’ परीक्षा दि. 20 ते 28 जून या कालावधीत होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या दि. 1 मार्चपासून सुरू होणार आहे. नेटची परीक्षा दुसऱ्यांदा कॉम्प्युटर बेस्ड अर्थात ऑनलाइनद्वारे होत आहे.

राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा दरवर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) घेण्यात येत होती. आता ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) होत आहे. ही परीक्षा यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आली. त्यावेळी प्रथमच नेट परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली. आता दुसरीही ऑनलाइन परीक्षा जून महिन्यात होणार असल्याची माहिती “एनटीए’ संस्थेने संकेतस्थळावर नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असिस्टंट प्रोफेसर किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिप या दोन्ही पदांसाठी जून महिन्यात होणाऱ्या नेट परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. नेटची ऑनलाइन परीक्षा दि. 20 ते 28 जून दरम्यान होईल. त्यासाठी अर्ज करण्याचा दि. 1 ते 30 मार्च असा कालावधी देण्यात आला आहे. या परीक्षेसाठी दि. 15 मे पासून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. परीक्षेचा निकाल 9 जुलैनंतर प्रसिद्ध केला जाणार असल्याचे “एनटीए’ने स्पष्ट केले आहे. जून महिन्यात होणारी नेट परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. नवीन अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)