“नृत्यांजली’त हरखले रसिक!

पिंपरी – नृत्यकला मंदिरच्या 120 विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय नृत्याचे प्रकार सादर केले. श्‍लोक, अलारिपू, पुष्पांजली, गीतम, सरस्वती कौतुकम, जतीस्वरम, वर्णनम्‌, तिल्लाना, मंगलमवरील विद्यार्थ्यांच्या पदलालित्यात नृत्य रसिक हरखून गेले होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नृत्यकला मंदिरतर्फे भरतनाट्यमच्या विविध नृत्य रचनांवर आधारित नृत्यांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना नुपूर दैठणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नृत्यांजली कार्यक्रमाचे यंदाचे 23 वे वर्ष होते. यावेळी तिसरी ते दहावी या वर्गातील विद्यार्थिनींनी त्यांची कला सादर केली. अंजना नायर यांनी कृष्णावर आधारीत नृत्य केले. विद्यार्थ्यांना गायन साथ प्रणाली जांभळे, मृदुंगावर एच. व्यंकटरमन, व्हायोलिनवर संजय उपाध्याय, नटुवांगम (पढन) तेजश्री अडिगे यांनी दिली.

नुपूर दैठणकर म्हणाल्या की, कलाकाराच्या कलेत, वागण्यात नम्रता हवी. त्यातूनच त्याला कला सादर करण्याचा आत्मविश्वास येत असतो. नृत्य सादर करताना कवीने जे मांडले आहे ते जसेच्या तसे आपल्या नृत्यातून व अभिनयातून सादर करायचे असते. यासाठी नृत्याचा नियमित रियाज करणे गरजेचे आहे. नृत्य, संगीत, गायन या कलेतून आपल्या पाल्यावर अनेक संस्कार होत असतात. त्यामुळे पाल्यांना वेगळ्या संस्कार वर्गाला पाठविण्याची गरज नसते, असेही दैठणकर यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी नृत्याचा अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दैठणकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन श्रद्धा मंडलेचा व शोभा कुलकर्णी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)