‘नुसतंच बगायला येत्यात… एवढी हौस असल तर कामं करायला या’

पुणे – “नुसतंच बगायला येत्यात…गर्दी करत्यात…एवढी हौस असल तर कामं करायला या’ असा संताप तेथील नागरिकांनी बघ्यांवर व्यक्त केला. येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पक्षाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर नागरिकांनी असा संताप व्यक्त केला.

वास्तविक या झोपडपट्टी भागामध्ये अतिशय अरुंद रस्ते आहेत. जेमतेम एकावेळी एका व्यक्तीला याठिकाणी जाता-येता येईल अशी परिस्थिती आहे. त्यात अनेक पक्षाचे नेते आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली आहे. नागरिकांच्या घरात चिखल झाल्याने त्यांना ते काढण्याची चिंता आहे. त्यांनी सगळे साहित्य बाहेर ठेवले आहे. अशा परिस्थितीत नेत्यांबरोबर निघालेल्या कार्यकर्त्यांचा पाय या साहित्यावर पडत होता. त्यामुळे तेथील रहिवासी अधिकच संतापले. त्यातून महापालिकेचे कर्मचारी मदतीला आले होते. जलसंपदा मंत्री येणार म्हटल्यानंतर ते ज्या रस्त्याने वस्तीत येणार तेथील गाळ, चिखल काढण्यात येत होता. मात्र तो पूर्णपणे निघाला नाही. त्यामुळे आधीच त्रासलेल्या नागरिकांनी “आम्हांला काम करू द्या…नाहीतर तुम्ही तरी आमचे घर स्वच्छ करून द्या’ असे संतप्तपणे बोलायला सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर, नेते, नगरसेवक, पदाधिकारी यांचीही भीड या नागरिकांनी ठेवली नाही. त्यांना केवळ आपल्या प्रपंचाची आणि कधी एकदा घर साफ करून मिळेल याची चिंता होती. त्यामुळेच त्यांच्याकडून अशा उद्विग्न प्रश्‍नांचा भडीमार सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)