नील नितिन मुकेशच्याही घरी हलणार पाळणा…

अभिनेता नील नितिन मुकेश याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची  बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  नील नितिन मुकेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी फार भाग्यशाली आहे., परिवारातील सारीच मंडळी रुक्मिणीच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून आहे. तिने काय करायला पाहिजे काय नाही ? याकडे लक्ष ठेवून आहेत.  मुलगा होणार की मुलगी याकडे मी फार लक्ष देत नाही. पण बाळाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

रूकिमीने नीलचे कौतुक करताना तो उत्तम पती आहे पण त्यासोबतच चांगला पिताही होणार आहे अशी आशा व्यक्त केली. गेले काही दिवस आम्ही चांगलं बेबी शॉपिंग करत आहोत. या दरम्यान मेडिटेसहन,योगा, संगीत याकडे आम्ही विशेष लक्ष दिले आहे. नील आणि रुक्मिणी यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)