नीरेतील कन्या शाळेच्या 72 मुलींना मोफत सायकल वाटप

नीरा- बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नीरा येथील सौ. लीलावती रिखवलाल शहा कन्या शाळेतील 72 मुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. या शाळेत जेऊर, निम्बूत, पाडेगाव, बाळू पाटलाचीवाडी,पिंपरे,गुळूंचे आदी परिसरातून मुली शिक्षणासाठी येतात. शाळेपासून दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतराहून येणाऱ्या या विद्यार्थिनींना या सायकल देण्यात आल्या. शाळेत येण्यासाठी नेहमीच एसटीची वाट पाहणाऱ्या मुलींना आता स्वतःच्या सायकलवरून शाळेत जायला मिळणार आहे. यावेळी सरपंच दिव्या पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष किरण जेधे, माजी उपसरपंच उत्तमराव घुले, उमेश चव्हाण, बापूराव पाटोळे, महिला समितीच्या रेणुका कोठडिया, स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष वसंतलाल गांधी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा लुटे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत साळुंखे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)