हर्षवर्धन पाटील : नीरा भीमा कारखान्यात रोलर पूजन
रेडा- नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने तब्बल अठरा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले असून शेतकरी सभासद यांचा विश्वास संपादन करून चांगला दर देण्याची परंपरा कारखान्याने राखली आहे. 20 व्या गळीत हंगामाची तयारी कारखान्याच्या वतीने अंतिम टप्प्यात करण्यात आल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी 2019-20 च्या गळीत हंगामासाठी बसविण्यात येणाऱ्या रोलरचे पूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी स्वागत केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, अमर पाटील, महादेव घाडगे, मनोज पाटील, सुरेश मेहेर, रणजित रणवरे, विश्वास काळकुटे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, तानाजीराव नाईक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.