नीरा नरसिंगपूरमध्ये कृषी सल्ला केंद्राचे उद्‌घाटन

नीरा नरसिंहपूर – अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी सल्ला केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.आर.आडत व प्रा. डी. एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामपंचायत कार्यालय येथे नुकतेच कृषी सल्ला केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी नरसिंहपूरच्या सरपंच कांचन डिंगरे, उपसरपंच दत्तात्रय महादेव ताठे, ग्रामसेवक गणेश लंबाते, दशरथ राऊत, हनुमंत ढवळे, तुकाराम बंडलकर, प्रकाश काळे, संतोष मोरे, किशोर मोहिते, दत्तात्रय देशमुख, हर्षद शिंदे, गणेश आसबे आदींसह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माने, तर शुभम भिसे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.