नीरव मोदीला लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट 

लंडन –

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नीरव मोदीला भारतात परत आणण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून भारतातील यंत्रणा नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी नीरव मोदी हा लंडन मध्ये वास्तव्यास असून तेथेच मुक्त संचार करत असल्याचे लंडनच्या ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. नीरव मोदीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब नॅशनल बँकेला ११४०० कोटींचा गंडा घातला असून त्याच्या विरोधात भारतीय तपास यंत्रणांनी इंटरपोल कडे रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे. त्यामळे लंडन कोर्टाकडून नीरव मोदीला अटक वॉरंट जारी केल्याने भारताच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.