नीरव मोदीच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ

लंडन- फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला सुनावण्यात आलेल्या कोठडीला ब्रिटनच्या न्यायलयाने ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेतील सुमारे 2 अब्ज डॉलरच गैरव्यवहाऱ्‌ आणि मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक झाल्यपासून नीरव मोदीला सध्या दक्षिण पश्‍चिम लंडनमधील वन्डस्वर्थ कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. त्याच्याविरोधात भारतात प्रत्यार्पण करण्याचा खटलाही सुरू आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर केले गेले होते. त्याच्या प्रत्यार्पणाशीशी संबंधित खटल्याच्या दुसऱ्या सत्राची सुनावणी सप्टेंबरमध्ये सुरू होणर आहे.

खटल्याच्या पहिल्या भागात त्याच्या विरोधात सकृतदर्शनी गैरव्यवहाराचा गुन्हा सिद्ध करण्यावर भर दिला गेला होता. तर सबळ पुरावा म्हणून भारत सरकारने कागदपत्रांचा आणखी एक संच सादर केल्यामुळे खटल्याचे वेळापत्रक पुन्हा नव्याने तयार करावे लागले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.